दोडामार्ग : दोडामार्ग तालुका केंद्र जिल्हा परिषद शाळेत मुलांचे जंगी स्वागत करत वर्गात प्रवेश पालकांची मोठी उपस्थिती

शेअर करा

दोडामार्ग, दि. १५ जून

उन्हाळी सुट्टी मध्ये बंद असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुट्टी संपल्यानंतर सोमवारी १५ जून रोजी सुरू झाल्या. दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात जिल्हा परिषद शाळा सोमवारी सुरू झाल्या मोठया उत्साहात शालेय मुले पालका समवेत दाखल झाली. दोडामार्ग तालुका केंद्र शाळा येथे सोमवारी पहिली ते सातवी मधील विद्यार्थी यांचे शाळेच्या आवारात
वाजतगाजत भव्य स्वागत करण्यात आले. दोडामार्ग नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत नगरसेविका संध्या राजेश प्रसादी यांच्या उपस्थितीत मुलांचे औक्षण, तसेच प्रवेश करताना फुलांचा वर्षात तसेच शाळा प्रवेश मुलांच्या पायाचे ठसे उमठवण्यात आले. या स्वागताने मुलांचे पालक देखील भारावून गेले.

मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टी निमित्ताने गेले काही दिवस शाळा बंद होत्या उन्हाळी सुट्टी संपल्यावर १५ जून रोजी महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या दोडामार्ग तालुका केंद्र शाळा या ठिकाणी सोमवारी मराठी शाळा टिकल्या पाहिजे यासाठी दोडामार्ग येथील पालकांनी आपल्या मुलांना
शाळेत आणले .
मुलांच्या स्वागतासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, तसेच गट शिक्षण विभाग दोडामार्ग येथील अधिकारी व पंचायत समिती ऋ कर्मचारी उपस्थित होते. मैदानावर शालेय विद्यार्थी तसेच पालक यांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक मुलांच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या वर्षाव करण्यात आला. पहिली दुसरी मधिल लहान मुली याना शाळेच्या दरवाजा वर उभे करून त्यांच्या पावलांचे ठसे कागदावर उमटवून आत घेण्यात आले आगळया वेगळया पध्दतीने स्वागत करण्यात आले.
मुलांच्या उपस्थिती मुळे शिक्षक वर्ग भारावून गेले. यावेळी नगरसेविका संध्या प्रसादी, नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने, महिला शिक्षिका यांनी मुलांचे स्वागत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप गवस, तसेच शालेय शिक्षक, सौ. एकता एकनाथ नाईक, सौ. मनिषा रेडकर, सौ. वर्षा वसंत काळे, अनिल विठ्ठल पाटील, तसेच केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी, पालक वर्ग उपस्थित होते.

शेअर करा