Dodamarg : कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात अवैध बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर!

शेअर करा

दोडामार्ग–सावंतवाडी रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक २२०/२ मधील बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह; नगरपंचायतीच्या कथित दुर्लक्षावरून चर्चेला उधाण.

दोडामार्ग, दि. १५ आॅक्टोबर

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कडून काही अवैध बांधकाम कडे हेतूपुरस्सर दूर्लक्ष केले जात आहे यामुळे एक एक प्रकरण पुढे येत आहे. कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात दोडामार्ग सावंतवाडी रस्त्यावर दोडामार्ग रूग्णालया पासून काही अंतरावर असलेल्या सर्व्हे नंबर २२०/२ च्या जमीनीत
स्पोर्टस काॅम्पलेक्स आरक्षण म्हणून नोंद केली असताना या जमीनीत बेकायदेशीर पणे भव्य पञाशेड उभारणी केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या बाबत सत्ताधारी नगरसेवक रामचंद्र ठाकूर, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुशांत अर्जुन राऊत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करुन तातडीने शेड बांधकाम पाडावे अशी मागणी केली आहे. दरम्यान नगरपंचायत बांधकाम विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता तक्रार आली आहे. एक महिन्यात शेड काढावी अशी नोटीस बजावली आहे असे सांगितले.

कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रात काही महिन्यांपूर्वी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत कडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी नाही शिवाय सदर जमीन प्रारूप विकास आराखडयात स्पोर्टस काॅम्पलेक्स आरक्षण म्हणून नोंद केली आहे. शासन निर्णय नुसार अशा प्रकारची नोंद केल्यावर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नियमबाह्य बांधकाम करता येत नाही असे असताना गोडावून वापर करण्यासाठी या ठिकाणी भव्य पञाशेड उभारणी केली ही बाब समोर आली आहे.
सदर भव्य पञाशेड तातडीने काढून टाकावी अन्यथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असे रामचंद्र ठाकूर सुशांत राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान नगरपंचायत बांधकाम विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी संकेत गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता सदर बेकायदेशीर पञाशेड एक महिन्याच्या आत काढून टाकावी अशी नोटीस बजावली आहे. असे सांगितले.

शेअर करा