दोडामार्ग :आडाळी औद्योगिक क्षेत्रात खनिज उत्खनन प्रकरण गाजत असताना कुंब्रल बागवाडी येथे बेकायदेशीर माती उत्खनन

शेअर करा

दोडामार्ग, दि. ४ जून

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक क्षेत्रात खनिज उत्खनन वाहतूक प्रकरण गाजत असतानाच महसूल विभाग यांची कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे परवानगी न घेता कुंब्रल बागवाडी येथे गावात रस्ता कडेला माती भराव टाकण्यासाठी बेकायदेशीर शेकडो ब्रास माती उत्खनन करून वाहतूक केल्याचे समोर आले आहे. या बाबत दोडामार्ग महसूल विभाग काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.
दोडामार्ग तालुक्यातील अनेक गावात अवैध खनिज माती उत्खनन केले जात आहे दोडामार्ग महसूल विभाग अधिकारी कर्मचारी यांचा धाग नसल्याने या घटना वाढत चालल्या आहेत. शासनाचा लाखो रुपये महसूल बुडवला जात आहे.
आडाळी औद्योगिक क्षेत्रात तसेच तळकट, भागात माती उत्खनन खनिज उत्खनन घटना समोर आल्या आहेत. असे असताना गेले काही दिवस कुंब्रल गावात अवैध माती उत्खनन करून ती रस्ता कडेला भराव मारण्यासाठी वाहतूक केली आहे.
कुंब्रल गावात अवैध माती उत्खनन करून वाहतूक केली हे समजताच मंडळ अधिकारी, महसूल कर्मचारी गुरुवारी घटना स्थळी जावून मोजमाप घेतले याबाबत आता काय दंड करतात याकडे लक्ष लागून आहे. घटना स्थळी माती ढिग आढळून आले तर अनेक डंपर माती वाहतूक करण्यात आली,

शेअर करा