दोडामार्ग, दि. २१ जून
दोडामार्ग ते विजघर रस्ता काम सुरू आहे. या ठिकाणी संबंधित ठेकेदार यांनी काम करताना आवश्यक खबरदारी घेतली नाही शिवाय वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी लक्ष देत नाही यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहेत. मेढे पाळये दरम्यान गरज नसताना रस्ता खोदून यात सिमेंट काँक्रिट खडी टाकली पण पाणी मारले नाही यामुळे ती उखडली आहे. यामुळे दुचाकी अपघात वाढले आहेत. रविवारी सकाळी कळसगादे येथील दुचाकी चालक खडीवरून मोटार सायकल घसरुन जखमी झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मायकल लोबो मदतीला धावले.
दोडामार्ग ते विजघर रस्ता धोकादायक परिस्थिती करून ठेवली आहे.यामुळे होता तो रस्ता खूप चांगला होता प्रवास सुखकर होता पण हा रस्ता आता अपघात क्षेत्र बनला आहे. असा आरोप केला जात आहे.
मेढे पाळये दरम्यान संबंधित ठेकेदार याने गरज नसताना रस्ता खोदला धोकादायक वळणावर ही परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. विजघर घाटीवडे, मुळस, मेढे रस्ता पूर्ण केला नाही आणि मेढे पाळये दरम्यान विनाकारण रस्ता खोदून वाट लावली आहे यामुळे पसरलेल्या खडी मुळे अपघात वाढले आहेत.
रविवारी सकाळी कळसगादे चंदगड येथील एक जण गोवा येथून घरी जात असताना उघडलेल्या सिमेंट काँक्रिट रस्त्यामुळे मोटार सायकल घसरुन खाली पडून जखमी झाला. यावेळी मायकल लोबो, इतर जण जणांनी मदत केली. अपुरे काम ठेवणाऱ्या ठेकेदार बाबत संताप व्यक्त केला जात आहे.