दोडामार्ग : विर्डी धबधबा वाॅटर पार्क येथे कर्नाटक मधिल पर्यटकाचा बुडून मृत्यू काही वर्षापूर्वी या ठिकाणी अशीच घटना घडली होती

शेअर करा

दोडामार्ग, दि. १८ जून

दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला गोवा कर्नाटक सीमेवर असलेल्या विर्डी धबधबा वाॅटर पार्क या ठिकाणी मौजमस्ती करण्यासाठी आलेल्या काही कर्नाटक मधिल पर्यटक या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी उतरले असता येथील पाण्याच्या खोल डोहात बुडून एकाचा मृत्यू झाला आहे यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. काही वर्षापूर्वी याच ठिकाणी गोवा येथील काही युवक आंघोळ करण्यासाठी आले असता एक जण बुडाला होता. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. बुडालेला युवक हा कर्नाटक मधिल आहे.

शेअर करा