चंदीगड येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील मुलींच्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत सुचित्रा चमकणार; ग्रामीण भागातील सरस्वती विद्यामंदिरने घडविले आतापर्यंत २७ राष्ट्रीय व ११० राज्यस्तरीय खेळाडू.
दोडामार्ग, दि. २१ आॅक्टोबर
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव आयोजित *राज्यस्तरिय शालेय साॅफ्टबाॅल अंजिक्यपद स्पर्धा व राज्य निवड चाचणीतून
धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि.काॅलेज आॅफ सायन्स,कुडासे ता.दोडामार्ग जि.सिंधुदुर्ग प्रशालेतील विद्यार्थीनी *कु.सुचित्रा सोमनाथ गोंधळी हिची चंदीगढ(पंजाब) येथे संपन्न होणार्या राष्ट्रीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धाकरिता महाराष्ट्र राज्याच्या 19 वर्षाखालील मुलीच्या संघात निवड झाली
कुडासे सारख्या ग्रामीण भागातील या प्रशालेतील आता पर्यत 27 राष्ट्रीय तर 110 राज्यस्तरीय खेळाडू घडले आहेत
संस्था अध्यक्षा मा.कल्पनाताई तोरसकर,कार्याध्यक्ष मा.डाॅ.मिलिंद तोरसकर,सचिव मा,संतोष सावंत,खजिनदार मा वैभव नाईक,समन्वय समिती सचिव मा.रश्मीताई तोरसकर,सहसचिव मा.नंदकुमार नाईक,मुख्याध्यापक मा.जालिंदर शेंडगे, सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,शालेय समिती सदस्य,पालक शिक्षक संघ,माजी विद्यार्थी संघ ,कुडासे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांंनी सुचित्राचे अभिनंदन केले