दोडामार्ग तालुका महाविकास आघाडीतर्फे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ राजीनामा घेऊन चौकशी करण्याची मागणी
दोडामार्ग, दि. ९ आॅक्टोबर
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एस आय आरच्या माध्यमातून देशभरातील मतदार यांची नावे वगळून मत चोरी सारखा गंभीर गुन्हा करून देशद्रोही सारखे काम केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्या या कारभाराबाबत संपूर्ण देशात आंदोलन करून कारवाई चौकशी राजीनामा मागितला जात आहे. निषेध केला जात आहे. दोडामार्ग तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीने शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार यांची भेट घेऊन ज्ञानेश कुमार यांच्या वर कारवाई करुन राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीने नायब तहसीलदार प्रज्ञा राजमाने याना सादर करून हे निवेदन केंद्र सरकारला पाठवा असे सांगितले.
भारतीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कथित मत चोरी संदर्भात जोरदार आंदोलन सुरू केली आहेत. पण केंद्र सरकार अद्याप निवडणूक आयुक्त वर कारवाई किंवा चौकशी करताना दिसत नाही. यामुळे आंदोलन तीव्र होत चालली आहेत. अनेक ठिकाणी ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळे जाळले जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आंदोलन केले जात आहे.
दोडामार्ग तालुक्यातील ठाकरे शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख संजय गवस, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गुणाजी गवस, कृष्णा धाऊसकर,
मनसेचे तालुकाप्रमुख विनायक सावंत, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.