कामाच्या पाहणीत दर्जाहीन बांधकाम उघड; मुख्य अभियंत्यांची मुंबईत भेट घेऊन तातडीने तपासणी करण्याची मागणी
दोडामार्ग, दि. १७ जून
दोडामार्ग ते विजघर रस्ता काम रस्ते विकास महामंडळ ( एम. एस. आय. डि सी.) अंतर्गत तीस किलोमीटर रस्ता काम सुरू आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आम. दिपक केसरकर यांनी नुकतीच विकास कामे पाहणी संदर्भात दोडामार्ग तालुक्यातील काही गावात कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता दोडामार्ग ते विजघर रस्ता काम निकृष्ट दर्जाचे केले हे उघडकीस आले आहे. या बाबत रस्ते निर्माण मुख्य अभियंता रणजित हांडे यांची आम. दिपक केसरकर यांनी मुंबई येथे भेट घेऊन तातडीने निकृष्ट दर्जाचे काम याची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दोडामार्ग ते विजघर रस्ता ईपीसी माॅडेल अंतर्गत सुरू आहे. या ठिकाणी दोन ठेकेदार कंपनी काम करत आहेत. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाच्या रस्ता निर्माण विकास महामंडळ कुणी नसतात यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहेत. सर्व मोऱ्या बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दोडामार्ग ते तिलारी दरम्यान एकाही मोरी पाईप खाली बीबीएम किंवा सिमेंट काँक्रिट घातले नाही मातीवर पाईप घातले आहेत. काही जणांनी ठेकेदार याला विचारले असता असेच काम आहे असे सांगितले. निकृष्ट दर्जाचे मोऱ्या बांधकाम केले आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघ आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्याला भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला होता. राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळ (MSIDC) योजने अंतर्गत कोल्हापूर नागणवाडी चंदगड रामघाट दोडामार्ग असनोडा राज्यमार्ग क्रमांक 189 किमी 0/100 ते किमी 3/00 तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग या ईपीसी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्याच्या काही भागाचे निकृष्ट काम केल्याचे निदर्शनास आले. त्या संदर्भात MSIDC चे मुख्य अभियंता श्री. रणजित हांडे यांची मुंबई येथे भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्य अभियंता श्री. रणजीत हांडे यांनी पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून तक्रारीच्या अनुषंगाने सदर कामांची पाहणी पाहणी करून उचित करावी करण्याचे आश्वासन दिले. श्री . हांडे पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून पाहणी करणार आहेत. यामुळे ठेकेदार यांच्या निकृष्ट दर्जाचे काम लोकांना होणारा त्रास याबाबत काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.