दोडामार्ग : चंदगड तालुक्यातील कोंबडया वाहतूक करणाऱ्या सुसाट मद्यपान वाहन चालक यांच्यावर कारवाई करा मनसेचे निवेदन

शेअर करा

दोडामार्ग,दि.०२ ऑगस्ट

चंदगड तालुक्यातील जवळपास वीस पेक्षा जास्त कोंबडया वाहतूक करणारी वाहने तिलारी घाटातून दोडामार्ग गोवा राज्यात ये जा करतात ही वाहने नेहमी सुसाट तसेच चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत असतात अशा सुसाट वाहनांमुळे नुकताच चंदगड नेसरी गडहिंग्लज मार्गावर अपघात होऊन सोनावल गावातील तरुण ठार झाला. असे अपघात होऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे याना निवेदन देऊन कारवाई करावी अशी मागणी केली.
दोडामार्ग ते विजघर रस्त्यावर
विजघर येथे पोलीस चेकपोस्ट आहे. या ठिकाणी कोंबडया वाहतूक करणारे वाहन चालक मद्यपान अवस्थेत आहेत याची तपासणी केली जात नाही गाडया सोडल्या जातात पोलिसांचा वरदहस्त नसल्याने कोंबडया वाहतूक वाहन चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. असा आरोप करण्यात आला.

चंदगड नेसरी गडहिंग्लज मार्गावर कोंबडया वाहतूक वाहन चालकाने दुचाकीला धडक दिली यात सोनावल गावातील तरुण ठार झाला. चंदगड तालुक्यातील कोंबडया वाहतूक करणारे वाहन चालक नेहमी सुसाट असतात तिलारी घाटातून देखील वाहन धारकांच्या अंगावर राहतात. डबल ट्रिप मारण्यासाठी वाहने सोडून घालतात दोडामार्ग पोलीस यावर कारवाई करताना दिसत नाही. तेव्हा कोंबडया वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची तपासणी तसेच वेगावर नियंत्रण याबाबत कारवाई झाली पाहिजे याकडे पोलीस निरीक्षक यांचे लक्ष वेधले.

शेअर करा