Dodamarg News: कसर्ई दोडामार्ग श्री देवी सातेरी मंदिरात नवराञौत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम सुरूवात

शेअर करा

सर्व वाडीतील ग्रामस्थ यांचा सहभाग

दोडामार्ग,दि.१३ ऑक्टोंबर

कसर्ई दोडामार्ग गावात सार्वजनिक नवराञौत्सव मंडळ वतीने जरी उत्सव साजरा करुन श्री देवी दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना केली जात असली तरी कसर्ई दोडामार्ग गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरी केळबाय मंदिरात देखील गेल्या काही वर्षांपासून नवराञौत्सव घटस्थापना पासून सुरुवात केली जाते.रविवारी धार्मिक विधी करून घटस्थापना करून उत्सव सुरू करण्यात आला. नऊ दिवस प्रत्येक वाडीतील ग्रामस्थ याना वार ठरवून दिले आहेत यावेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व भाविक ग्रामस्थ यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.
मंगळवारी दोडामार्ग सावंतवाडा येथील ग्रामस्थ यांचा होता सकाळी अभिषेक पूजा ओटी भरणे आरती महाप्रसाद, भजन दिंडी असे विविध कार्यक्रम पार पडले राञी दशावतारी नाटय प्रयोग सादर झाला.
बुधवारी १४ रोजी
म्हावळणकरवाडी, सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद
भजन, घुमट आरती, १५ रोजी वरचीधाटवाडी सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद दुपारी भजन स्वरश्रुगांर भजन मंडळ म्हापसा गोवा यांचा कार्यक्रम राञी डबलबारी, दिनांक १६ रोजी सोलदे
शिव कृपा नगर सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद, दिंडी, हरिपाठ, स्वयंभू दिंडी पथक वझरे,
केळबाय, वारकरी संप्रदाय मुळगाव गोवा, नामवंत कलाकार यांचे भजन १७ रोजी बाजारपेठ गावडेवाडी, सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद, घुमट आरती नामवंत कलाकार भजन राञी आॅक्रेष्ट्रा रिदमस्टार, १८ रोजी
खालचीधाटवाडी, सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद,
ग्रामस्थ भजन घुमट आरती. राञी नाटक हास्य रहस्य रविवारी १९ रोजी सुरुची वाडी दोडामार्ग सकाळी अभिषेक पूजा आरती महाप्रसाद, सावंतवाडा येथील नामवंत कलाकार यांचे भजन राञी
बोर्डेकर दशावतार नाटय मंडळ दोडामार्ग यांचा नाटय प्रयोग सादर होईल.
तरी सर्व भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष गोविंद महाले, उत्सव समिती अध्यक्ष प्रदीप चांदेलकर, देवस्थान समिती सचिव संदीप गवस दोडामार्ग ग्रामस्थ यांनी कळवले आहे.

शेअर करा