जीर्ण शासकीय इमारतींच्या दुरुस्तीच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप; स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
दोडामार्ग, दि.१२ ऑगस्ट
तिलारी धरण प्रकल्प म्हणजे एक प्रकारे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी बनली आहे. या ठिकाणी केवळ कामाच्या नावाखाली मलिदा लाटण्याचा प्रकार सुरू आहे. कोनाळकट्टा तिलारी येथे शासकीय कार्यालये इमारती पन्नास वर्षे झाली त्या जीर्ण झाल्या आहेत. अनेक ठिकाणी कोसळत आहेत या ठिकाणी नवीन इमारत बांधणे हाच एकमेव पर्याय असताना गेल्या वर्षी या इमारती छप्पर दुरुस्ती नावाखाली लाखो रुपये खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचे झाले ते छप्पर मोडकळीस आले आहे. ही वस्तुस्थिती असताना लाकडे मशानात गेली अखेरच्या घटका मोजत आहेत या शासकीय कार्यालये इमारती दुरुस्ती करण्यासाठी चक्क ५८ लाखाचे काम काढून चक्क मलिदा लाटण्याचा प्रकार सुरू आहे. तिलारी मध्ये राजरोस पणे सुरू असलेल्या या कामांची सखोल चौकशी करून स्थानिक अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
तिलारी धरण हा आंतरराज्य प्रकल्प आहे. या ठिकाणी गोवा सरकारकडून निधी पुरवला जातो पण त्याचा विनियोग कशा प्रकारे स्थानिक अधिकारी करतात याकडे गोवा सरकार लक्ष देत नाही यामुळे तिलारी धरण ठिकाणी गरज नसताना कोटयावधी रूपये उधळपट्टी केली जात आहे. तिलारी येथे आवश्यक असलेले विश्रामगृह अखेर कोसळले यासाठी पैसे नाहीत पण शासकीय कार्यालये कर्मचारी चार पाच जण या इमारती केव्हा कोसळून पडू शकतात यावर चक्क ५८ लाख रुपये खर्च यामुळे जोरदार चर्चा सुरू झाली आहे.