दोडामार्ग, दि. २४ आॅगस्ट
महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांचा संयुक्त आंतरराज्य प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिलारी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याची स्थिती धोकादायक तसेच बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांत कालवे फुटून याचा परिणाम गोवा राज्यावर जाणवू लागला या पार्श्वभूमीवर दोन्ही कालवे चार महिने बंद ठेवून युध्द पातळीवर दर्जेदार दुरुस्ती पुनर्स्थापना कामे सुरू केली जाणार आहे यासाठी दोन्ही राज्य यांच्या सहमतीने १ आॅक्टोबर ते ३१ जानेवारी पर्यंत दोन्ही कालवे बंद राहणार आहेत. तेव्हा सिंचनासाठी तिलारी कालव्याचे पाणी उपलब्ध होणार नाही. अशी माहिती जलसंपदा विभाग कडून स्थानिक ग्रामपंचायत मार्फत शेतकरी याना कळविली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याची बांधणी होऊन चाळीस वर्षे पेक्षा जास्त वर्षे उलटली आहेत. अनेक ठिकाणी माती भराव टाकून तर काही ठिकाणी खोदकाम करून धरणाचे पाणी गोवा राज्यातील पेडणे, डिचोली तालुक्यातील काही गावात तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प यासाठी गोवा राज्यात देण्यासाठी कालवे तयार केले. यातील काही पाणी हे दोडामार्ग तालुक्यातील काही गावे बांदा सावंतवाडी मध्ये सिंचन प्रकल्प शेती यासाठी पुरवठा केला जातो. आज दोन्ही कालवे धोकादायक स्थितीत आहेत यामुळे दुरुस्ती शिवाय पर्याय नाही यामुळे महाराष्ट्र व गोवा सरकारने संयुक्त निर्णय घेतला आहे.