जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक १ च्या आवारातील मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण; विद्यार्थ्यांच्या सुरक्षित ये-जा करण्याची सोय.
दोडामार्ग, दि २१ जून
दोडामार्ग जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर एक आवारात चिखल माती मुळे पहिली ते सातवी पर्यंत मुलांना यातून ये जा करावी लागत होती ही बाब सामाजिक कार्यकर्ते माजी उपसभापती, शिवसेना उप जिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आपल्यावर तातडीने हालचाल करून शाळेच्या आवारात मुलांची ये जा असलेल्या मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण करून मुलांची चिखलातून सुटका केली . निंबाळकर यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
दोडामार्ग जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर एक आवारात पाऊस पडला कि चिखल होत होता. यात
गुरांचा वावर यामुळे चिखल मातीतून मुलांना वाट काढावी लागत होती. यामुळे शाळेत पण चिखल माती जात होती. ही बाब राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आली.
राजेंद्र निंबाळकर यांनी तातडीने आपली यंत्रणा कामाला लावली. लगेच खडी, वाळू, सिमेंट, मिक्सर आणून कामगार मार्फत मुलांचा मार्ग ते शाळेच्या आवारात संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरण करून दिले.
यामुळे शाळेच्या आवारात मुलांना आता चिखल माती ऐवजी चांगल्या सिमेंट काँक्रीटीकरण वाटेचा वापर करून जाणे सोयीस्कर झाले आहे. राजेंद्र निंबाळकर यांच्या सामाजिक उपक्रम याचे कौतुक केले आहे.