दोडामार्ग : घोटगेवाडी काॅजवेवरून दोन वाहुन गेल्यानंतर जलसंपदा विभाग कडून काॅजवे ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात

शेअर करा

दोडामार्ग, दि. २० आॅगस्ट

घोटगेवाडी काॅजवेवरून पावसाळ्यात सतत पाणी वाहत असत काही वेळा धरणातून पाणी विसर्ग कमी झाला की घोटगेवाडी काॅजवेवरून ये जा करता येते पाणी असताना प्रवास करू नका असे आवाहन करून देखील काही जण आपला शहाणपण करतात नुकतीच एक घटना घडली एक मुलगा युवक जात असताना वाहुन गेले. यामुळे नागरीकांनी जलसंपदा विभाग अधिकारी यांना दोन्ही बाजूंनी गेट घाला किंवा तातडीने दोन्ही बाजूंनी सुरक्षा रक्षक तैनात करा अशी मागणी केली होती. अखेर गुरुवारी घोटगेवाडी काॅजवेच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले आहे. यामुळे दुर्घटना रोखणे शक्य होणार आहे.
पावसाळ्यात तिलारी नदीला मोठया प्रमाणात पाणी असते त्यात तेरवण मेढे धरण, तिलारी धरणातून पाणी विसर्ग सुरू झाला कि घोटगेवाडी काॅजवेवरून पाणी जाते मार्ग बंद होतो तरी काही जण जीव धोक्यात घालून प्रवास करतात.
तीन दिवसांपूर्वी छत्तीसगढ राज्यातील युवक मुलगा घोटगेवाडी काॅजवेवरून कोनाळकट्टा येथे आले होते तेव्हा पाणी कमी होते पण काही वेळाने हे दोघे काॅजवेवरून पाणी असताना जात होते यावेळी पाणी प्रवाह वाढला आणि हे दोघे वाहुन गेले होते.
घटनास्थळी जमलेल्या नागरीकांनी घोटगेवाडी काॅजवेवरून पाणी असताना कुणाला सोडू नये यासाठी तिलारी जलसंपदा विभाग दोन्ही बाजूंनी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत

शेअर करा