दोडामार्ग,दि.०२ ऑगस्ट
दोडामार्ग ते बेळगाव मार्गावर रविवारी पहाटे बेळगाव येथे माल भरून गोवा दिशेने जाणारा एक मालवाहतूक टेम्पो चालकाला डूलकी आल्याने आंबेली कोनाळकरवाडी येथे अपघात झाला रस्ता कडेला टाकलेल्या माती भरावामुळे टेम्पो पलटी होता होता वाचला या अपघात मुळे वाहतूक विस्कळीत झाली. अखेर क्रेन आणून टेम्पो काढण्यात आला.