दोडामार्ग : महावितरणच्या मनमानी कारभारामुळे विर्डी ग्रामस्थ हैराण

शेअर करा

तातडीने दखल न घेतल्यास उपोषणाचा इशारा; उपसरपंच एकनाथ गावस यांचा प्रशासनाला इशारा

दोडामार्ग, दि. ५ जून

दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या विर्डी गावात गेल्या काही महिन्यांपासून वीज महावितरण यांचा मनमानी कारभार सुरू आहे. वीज पुरवठा खंडीत तसेच वेळीच बिल न देणे रिडींग न घेणे चार पाच महिन्यांनी भरमसाठ बिल देणे इतर समस्या या बाबत संबंधित वीज महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने या बाबी दूर केल्या नाही तर मंगळवारी ९ जून रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा उपसरपंच माजी उपसभापती एकनाथ गवस यांनी दिला आहे.


दोडामार्ग ते विर्डी अंतर पंचवीस किलोमीटरहून जास्त आहे. शिवाय एका बाजूला असलेला गाव वाहतूक व्यवस्था पुरेशी नाही या विर्डी गावात वीज समस्या गंभीर बाब बनली आहे. कित्येक महिने तक्रार करून देखील दखल घेतली जात नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी पासून मिटर रिडींग न घेता कशीही बिले दिली जात आहेत मीटर चेक केले जात नाही असे एकनाथ गवस यांनी निवेदनात म्हटले आहे.
चार पाच महिने झाले कि रिडींग नसलेली मागिल युनिट उपलब्ध नाही असे सांगून पाच सहा महिने बिले माथी मारली जात आहे तर काही जणांना प्रथम झिरो बिले नंतर भरमसाठ देणे कधीही मिटर रिडींग घेतले जात नाही. गावात वीज ग्राहकांना बिले कमी करुन द्या अशी मागणी करुन देखील वीज महावितरण लक्ष देत नाही.


विर्डी गावातील वीज समस्या वीज बिल कमी करणे मीटर चेक करणे या बाबी तातडीने सोडवल्या नाही तर ९ जून रोजी वीज ग्राहक ग्रामपंचायत सदस्य याना घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा विर्डी उपसरपंच एकनाथ गवस यांनी दिला आहे.

शेअर करा