​सावंतवाडी: जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने 220 मरणोत्तर देहदान

शेअर करा

​सावंतवाडी,दि.२ जुलै

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.३ जुलै २०२६ रोजी देवबाग,ता.मालवण येथिल श्रीम.मनिषा मधुसुदन तांडेल हीचे मरणोत्तर देहदान शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे करण्यात आले.त्यावेळी त्यांचे पती श्री.मधुसुदन भिसाजी तांडेल,दिर-श्री.रमाकांत भिसाजी तांडेल व कुटुंबिय ऊपस्थित होते.
आजपर्यंत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने २१९ मरणोत्तर देहदान व १८२ अवयव दान करण्यात आलेले आहे.
देहदान प्रक्रियेच्या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचचे प्रमुख डाँ.दवंगे,जिल्हा शल्य चिकीत्सक डाँ.श्रीपाद पाटील,शरीरशास्र विभाग प्रमुख प्राजक्ता थेटे,नेत्र शल्य चिकीत्सक डाँ.बाळासाहेब जोशी,नेत्र चिकीत्सा अधिकारी डाँ.कौस्तुभ देशपांडे,नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे आणि कर्मचारी गोसावी आदी संबंधित अधिकारी ऊपस्थित होते.
याप्रसंगी रामानंद सांप्रदाय सिंधुदूर्ग पदाधिकारी,व जगद्गुरु रामानंचार्य नरेंद्राचार्यजी यांंचे भक्तगण मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

शेअर करा