वाहनचालक आणि नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाची कारवाई.
कणकवली,दि.२९ ऑक्टोंबर
कणकवली नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने उपायायोजना सुरू केल्या आहेत. गुरुवारी मोकाट गुरांना पडकण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मारकुट्या बैलाला न. पं. च्या कर्मचाºयांनी पकडले.
कणकवली शहरात मोकाट गुरांनी उच्छाद मांडला आहे. गुरांचा त्रास वाहन चालकासह पदाचाºयांना होत आहे. गुरांच्या रस्त्यांवरील वावरामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे, शहरात गेल्या काही दिवसांपासून एका मारकुट्या बैलाने धुमाकूळ घातला होता. या बैलाने ज्येष्ठावर नागरिकाला हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत होती. याची दखल प्रशासनाने घेत गुरुवारपासून शहरातील मोकाट गुरे पडकण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मारकुट्या बैलाला पकडण्यासाठी नगरपंचायत कर्मचाºयांकडून प्रयत्न करण्यात आले. अखेर कर्मचाºयांना या बैलाला पकडण्यात यश आले. याबद्दल नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कर्मचाºयांचे कौतुक केले. मारकुट्या बैलाला पकडण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून मोकाट गुरांच्या बंदोबस्तासाठी पकड मोहीम हाती घेतल्याने शहरवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.