दोडामार्ग, दि. १२ आॅगस्ट
दोडामार्ग तालुक्यातील हत्ती उपद्रव रोखण्यासाठी राज्य सरकार वन विभाग अपयशी ठरले आहे. यामुळे शेतकरी बांधवांना हत्ती कडून होणारे नुकसान बघत बसण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. पाळये गावात धुमाकूळ घालणाऱ्या रानटी हत्ती कडून येथील लक्ष्मण दळवी, अजय सावंत, फर्नांडिस, यांच्या काजू बागायती दगडी कंपाऊंड तसेच जाळी कंपाऊंड तोडून मोठे नुकसान केले आहे. वन विभाग राज्य सरकारने तातडीने हत्ती पकड मोहीम राबवून हत्ती मुक्त दोडामार्ग तालुका करावा अशी मागणी केली जात आहे.
गेल्या तीन चार दिवसापासून पाळये गावात रानटी हत्ती कळपाचा धुमाकूळ सुरू आहे. नारायण दळवी यांच्या बागायती मध्ये नुकसान केले. या नंतर मोर्चा इतर ठिकाणी वळवला. मंगळवारी रात्री उशिरा पाळये गावातील तीन ते चार शेतकरी बांधवांच्या शेती बागायती नुकसान केले.
लक्ष्मण दळवी यांच्या काजू बागेची मोठया प्रमाणात वाट लावली. तसेच हा कळप अजय सावंत यांच्या बागेत शिरकाव करत काजू बागायती मध्ये धुमाकूळ घातला. हजारो रुपये खर्च करून अजय सावंत यांनी जाळीचे कंपाऊंड घातले होते. ते कंपाऊंड हत्तीने पायदळी तुडवत खांब वाकवून ठेवले जाळी तोडून टाकली. तसेच फर्नांडिस यांनी शेती सभोवताली जंगली वन्य प्राणी कडून रक्षण करण्यासाठी दगडी चिरेबंदी कंपाऊंड घातले होते ते हत्ती कडून तोडून आत प्रवेश केला. लाखो रुपये नुकसान एका रात्रीत केले आहे.