सिंधुदुर्ग 24 तास ते सिंधुदुर्ग संवाद : नव्या पर्वाचा शुभारंभ

शेअर करा

देवगड किल्ला गणपती मंदिरात वेबसाईट व लोगोचे अनावरण; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव

देवगड : देवगड किल्ला येथील श्री गणपती मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्यात आली. गेली अनेक वर्षे जनतेचा आवाज बनलेल्या सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल न्यूज नेटवर्कने आता अधिक व्यापक आणि प्रभावी माध्यमाच्या दिशेने वाटचाल करत “सिंधुदुर्ग संवाद” या नव्या रूपात पदार्पण केले.
या शुभारंभ प्रसंगी उद्योजक नंदकुमार घाटे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग संवाद या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक तथा व्यवस्थापक दयानंद मांगले यांच्या हस्ते संस्थेच्या नव्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुदुर्ग 24 तासच्या नव्या वाटचालीबद्दल उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव करत भविष्यातही सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य अधिक ताकदीने सुरू राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी उपाध्यक्ष शिवराम निकम, ज्येष्ठ पत्रकार संतोष कुलकर्णी, मंगेश ठुकरूल, ज्ञानदेव भडसाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी “सिंधुदुर्ग संवाद”च्या नव्या वाटचालीस शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

शेअर करा