कणकवली ; नेरुर येथे दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप

शेअर करा

कणकवली,दि.०२ ऑगस्ट

महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल व कलेश्वर मंदिर नेरूर यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा संपन्न झाला.
यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर ,ग्रामपंचायत सदस्य अनुजा नेरुरकर , रोशनी नाईक रचना नेरुरकर , चेंदवन ग्रामपंचायत अधिकारी सतीश साळगावकर , ग्रा.प.सदस्य नारायण शृंगारे, गौतम चेंदवणकर, तंटामुक्त समिती चेंदवण अध्यक्ष भुपेश चेंदवणकर, ग्रा.प. कर्मचारी गोविंद रांगणेकर, स्वाती परब जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे कर्मचारी विशाखा कासले ,ललित गावडे ,गीता परब आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात हेलन केलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेच्या कामाचे वाचन केले.


यावेळी जिल्हा समन्वयक अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. विविध योजनांचे फायदे सांगितले. तसेच नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर यांनी देखील दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.गुरुपौर्णिमेनिमित्त संस्थापक अनिल शिंगाडे यांचा सत्कार केला. या मेळाव्यामध्ये दिव्यांग बांधवांची आवश्यक साहित्य नोंदणी करण्यात आली. तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने अभय म्हाडगुत यांना व्हीलचेअर देण्यात आली. त्याचप्रमाणे तुकाराम नारिंगरेकर व अनंत पाटील यांना वॉकिंग स्टिक देण्यात आली. तसेच दोन दिव्यांग बांधवांना कानाची मशीन देण्यात आली.या मेळाव्यामध्ये पन्नास हून जास्त दिव्यांग सहभागी होते. दिव्यांग बांधवांना जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने वतीने भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग बांधवांच्या पाल्यांना शैक्षणिक स्कूल किट वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

शेअर करा