कणकवली : पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जून रोजी कणकवलीत रक्तदान शिबिर

शेअर करा

कणकवली, दि. २० जून

महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका भाजपाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर सोमवार दिनांक २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

रक्तदान हे श्रेष्ठदान असून गरजू रुग्णांसाठी रक्ताची गरज लक्षात घेता जास्तीत जास्त रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा पदाधिकारी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर आणि अण्णा कोदे यांनी केले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा