कणकवली,दि. २२ जून
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली तालुक्यातील संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रहास उर्फ बबली राणे यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कळसुली विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना जिल्हाप्रमुख सिंधुदुर्ग तथा माजी आमदार वैभव विजय नाईक यांनी पत्र देत केली आहे. नियुक्तीपत्र देत पक्षाच्या संघटनात्मक कामाला बळ देण्याची जबाबदारी चंद्रहास राणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून चंद्रहास राणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.