कणकवली : कणकवलीत बंद असलेल्या स्टॉलधारकांना मुख्याधिका-यांचा दणका

शेअर करा

बंद स्टॉल, टप-या, दुकाने नगरपंचायतने हटविली ; उड्डाणपुलाखाली ल दुकाने हटवल्याने झाले चकाचक

कणकवली,दि.०५ जुन

शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविण्याच्यादृष्टीने नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील स्वत: दुस-या दिवशी रस्त्यावर उतरत धडक कारवाईची मोहिम सुरु ठेवली आहे. नगरपंचायतच्या अधिकारी कर्मचा-यांसह अतिक्रमण हटाव पथकाने शुक्रवारी उड्डाणपुलाखालील काही बंद स्टॉल थेट टॅक्टर मध्ये भरुन जप्तीची कारवाई केली आहे. त्यामुळे कणकवली पटवर्धन चौक येथील उड्डाणपुलाखालील परिसर स्टॉल हटवल्यामुळे मोकळा श्वास घेताना दिसत आहे. दरम्यान, कणकवली शहरात बकाल अवस्था निर्माण झाली होती. त्यामुळे उड्डाणपुलाखालील परिसर मोकळा करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री व नगराध्यक्ष यांच्या सुचनेनुसार ही कारवाई होत आहे. ही अतिक्रमण हटाव मोहिम सातत्यपूर्वक सुरु राहिल , असा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला आहे.

कणकवली शहरात पटवर्धन चौक ते बसस्थानक उड्डाणपुलाखाली गुरुवारी मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सकाळी 10 वाजल्यापासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. अनाधिकृत स्टॉल स्वत:हून हटवा, अन्यथा आम्ही हटविणार, असा इशारा देतानाच स्टॉलधारकांना स्वत:हून स्टॉल काढण्यास काही वेळ देत अतिक्रमण हटाव मोहिम राबवली. या मोहिमे दरम्यान , बरेच बंद असलेले स्टॉल नगरपंचायत टॅक्टर मध्ये भरुन हटवण्यात आले. यावेळी काही स्टॉलधारकांसोबत मुख्याधिकारी यांची शाब्दिक बाचाबाची झाली.
फळ , फुल , विक्रेत्यांना काहीसा दिलासा -\

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली दररोज फळे, फुले व भाजी विक्रेत्यांना नव्याने पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत तात्पूर्ते त्याचठिकाणी मर्यादित जागेत व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्‌ध करुन दिली जाणार आहे. त्यामुळे चालु दुकाने असलेल्या विक्रेत्यांवर हटाव मोहिमेत कारवाई करण्यात आलेली नाही. पण या सर्व विक्रेत्यांची यादी करून एका कुटुंबाला एक या प्रमाणे जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. या भाजी व इतर खरेदी करताना पुलाखाली आतील बाजूला येऊनच खरेदी करावे लागेल. सर्व्हिस रोडवरून थेट खरेदी करता येईल , अशी दुकानांची मांडणी करता येणार नाही , अशी भूमिका नगरपंचायत प्रशासनाची माणुसकीच्या भावनेतून असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या शेड परिसर झाला चकाचक
मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नियंत्रणाखालील अतिक्रमण हटाव मोहीम पथकाने केलेल्या बुधवारी केलेल्या पाहणीत रिक्षा संघटनेकडून येथील पेट्रोल पंपासमोर उड्डाणपुलाखाली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. यासाठी तात्पुरता पत्र्याचा मंडप उभारला आहे. मात्र, या मंडपात लसूणचे गोडाऊन केलेल्याचे दिसून आले आहे. याबाबत गौरी पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबाबच चौकशी करून पुढील दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शुक्रवारी सदर जागेतील लसूण हलविण्यात आली असून हा परिसर स्वच्छ झाल्याचे दिसून आले.

स्टॉलधारकांवर दंडात्मक कारवाई
शहरातील उड्डाणपुलाखालील जागेत एका कुटुंबाने मोठी जाग अडविल्याचे दिसून आले. एकाच कुटुंबातील काहींनी तीन – चार दुकाने थाटली असल्याचे तपासणीत उघड झाले. विविध स्टॉल, चायनिज, चहाची दुकाने, पानटप-या टाकून अनेकांनी जागा अडवल्या होत्या. शुक्रवारी अतिक्रमण हटाव पथकाने स्टॉल हटवून जप्त करून अतिक्रमण करणा-या स्टॉल धारकांना दणका देत स्टॉल जप्त करण्यात आले आहेत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला आहे.

शेअर करा