कणकवली मुख्याधिका-यांचे काम चांगले – समीर नलावडे

शेअर करा

कणकवली,दि.१३ ऑगस्ट

कणकवली नगरपंचायत स्थापन झाल्यापासून मी येथील कारभार जवळून पाहत आहे. प्रशासकीय असलेल्या अधिकारांचा वापर करुन मुख्याधिकारी गौरी पाटील काम करीत आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांनी त्यांच्या विरोधात केलेल्या तक्रारींमधून काहीही निष्पन्न होणार नसून, मुख्याधिकाऱ्यांना पूर्णपणे क्लीन चिट मिळेल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केला.

गौरी पाटील यांनी कणकवलीसोबतच देवगड नगरपालिकेचा अतिरिक्त कारभारही चांगल्या प्रकारे हाकलला आहे. तेथील नगरसेवकांकडूनही त्यांच्या कामाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आहेत. गेल्या आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीत गौरी पाटील यांनी नगरपंचायतीचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला असून, त्यांच्या प्रशासकीय कामकाजात कोणतीही गंभीर चूक झालेली नाही. नगरपंचायतीच्या इतिहासात मुख्याधिकाऱ्यांविरोधात तक्रार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नगरपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुख या नात्याने नियमांच्या चौकटीत राहून निर्णय घेण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्या 21 निविदांबाबत मुख्याधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील ‘कलम ३०८’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली असून, ही त्यांची नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे.
२१ टेंडर प्रकरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असून अंतिम निकाल अद्याप प्रलंबित असल्याचे श्री. नलावडे यांनी सांगितले.

शेअर करा