कणकवली : इन्सुली येथील निराधार जनाबाई पाटील हिच्या घरावर पत्रांचे छप्पर…

शेअर करा

युवा संदेश प्रतिष्ठानच्या पाठपुरावाला यश ; निराधार महिला जनाबाई पाटील यांनी मदतकर्त्यांचे मानले आभार

कणकवली :

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली पागावाडी येथील वृद्ध व निराधार महिला जनाबाई धोंडू पाटील यांच्या बिकट परिस्थितीची माहिती समजताच सर्वप्रथम युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी तत्काळ त्यांच्या घरी भेट देत तीन महिने पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीचा हात दिला होता. त्यांच्या पडक्या घराबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या पाठपुराव्याने जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेतली. स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी पाटील कुटुंबियांची भेट घेत माहिती घेतली. जिल्हा परिषद घर दुरुस्ती योजनेतून तात्काळ 20 हजार रुपयांची मदत देत घरावर पत्रांचे छप्पर पावसापूर्वी घालण्यात आले आहे.युवा संदेश प्रतिष्ठानच्या पाठपुरावाला यश आले आहे. निराधार महिला जनाबाई पाटील यांनी मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत.

जिल्हा परिषद योजनांमधून घर दुरुस्तीसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे, पंतप्रधान आवास योजना मध्ये या कुटुंबाला लाभ देण्यात येणार आहे. आयुष्यमान कार्ड नोंदणी पूर्ण झाली आहे.जनाबाई धोंडू पाटील मुलाला टीबी तपासणी आणि मोफत औषध देण्यात येणार आहेत. संजय गांधी निराधार योजना लागू करण्यात येणार आहे. पंतप्रधान महिला सन्मान योजना लाभ देण्यात येणार आहे.अंत्योदय योजना मधून मोफत ३५ किलो धान्य सुरु करण्यात येणार आहे.

युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजना सावंत यांच्या पुढाकाराने या सर्व योजना सुरू करण्यात आले आहे प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करत निराधार जनाबाई पाटील या कुटुंबाला न्याय देण्यात आला आहे. त्याबद्दल युवा संदेश प्रतिष्ठानचे सामाजिक बांधिलकी बद्दल कौतुक होत आहे.

शेअर करा