कणकवली : ओसरगावचे माजी उपसरपंच प्रदीप तळेकर यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश

शेअर करा

माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत

कणकवली,दि. २२ जून

ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट भजनी बुवा प्रदीप तळेकर यांनी माजी खा.विनायक राऊत , माजी आ. वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे, प्रमोद कावले, नितीन धुरी, बबन देसाई , दशरत शिंदे, बंड्या भुजबळ, दिलीप तळेकर ,पांडुरंग शिंदे ,यशवंत चव्हाण ,मुरलीधर परब, महादेव राठवड ,प्रमोद सावंत ,राजू राणे, प्रकाश परब, रवी परब ,अनंत राणे, रवी सावंत, शिरीष घाडीगावकर व विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा