कणकवली : कणकवली नगरपंचायतीमार्फत “एकल महिला दिवस” साजरा होणार

शेअर करा

कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे एकल महिलांना सहभाग घेण्याचे आवाहन

कणकवली , दि. २० जून

महाराष्ट्र शासनामार्फत राज्याचे “एकल महिला धोरण” तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर दि. २३ जून रोजी साजरा होणारा “आंतरराष्ट्रीय विधवा दिन” हा “एकल महिला दिवस” म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे.

या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत, दीनदयाळ अंत्योदय योजना–शहरी (DAY-NULM) व महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नगरवाचनालय हॉल, कणकवली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये कणकवली शहरातील एकल महिलांच्या समस्या, अडचणी तसेच शासनाकडून अपेक्षित उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध पेन्शन योजना, रोजगार, स्वयंरोजगार व उपजीविकेच्या संधी याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी कणकवली शहरातील जास्तीत जास्त एकल महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.

शेअर करा