कणकवली : कणकवलीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘लव-कुश’ दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन

शेअर करा

कणकवली,दि. २२ जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समीर नलावडे व संदेश उर्फ गोट्या सावंत मित्र मंडळाच्या वतीने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, कणकवली येथे संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग ‘लव-कुश’ सादर होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रिय व नामवंत कलाकारांच्या सहभागातून हा नाट्यप्रयोग रंगणार असून दशावतार रसिकांसाठी ही एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या प्रयोगात महागणपती – अण्णा कवटकर, ऋद्धी-सिद्धी – आप्पा नाईक, राम – आनंद नार्वेकर, लक्ष्मण – उदय वनसकर, वाल्मिकी – रोहित नाईक, सीता – यश जळवी, मडवळ – सुहास गावडे, मडवळीण – श्रीराम साईल, मारुती – प्रथमेश खवणेकर, लव – सागर हनपडे आणि कुश – विश्वजित परब यांसारख्या विविध भूमिका अनुभवी कलाकार साकारणार आहेत.

या प्रयोगात महागणपती,
संगीताची धुरा मंदार जोशी (हार्मोनियम), निखिल निकम (पखवाज) आणि बाबू कोरगावकर (झांज) सांभाळणार आहेत.
तसेच देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने नागरिक, दशावतार प्रेमी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सिंधुदुर्गच्या समृद्ध लोककला परंपरेचे दर्शन घडविणारा ठरणार असून ‘लव-कुश’ या पौराणिक कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्जेदार मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

शेअर करा