कणकवली : आमदार प्रमोद जठार परमहंस भालचंद्र महाराजांच्या चरणी नतमस्तक

शेअर करा

कणकवली,दि.०४ जुन

कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार यांनी प्रथमच कणकवलीचे आराध्य दैवत परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पवित्र स्थळी भेट देत दर्शन घेतले .
यावेळी आमदार जठार यांनी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना केली. दर्शनानंतर त्यांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला.

या प्रसंगी व्यवस्थापक विजय केळूसकर, बबलु सावंत, शिशिर परुळेकर, चिंटू नार्वेकर, शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेटये तसेच परमहंस भालचंद्र महाराजांचे अनेक भाविक भक्त उपस्थित होते. आमदार प्रमोद जठार यांच्या या भेटीमुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
“दैवताचे आशीर्वाद आणि जनतेचा विश्वास याच्या बळावर मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार,” अशी भावना यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केली.

शेअर करा