कणकवली,दि.२९ ऑक्टोंबर
युवा व्यावसायिक सुनील प्रकाश चव्हाण ( वय 40, सध्या रा. घणसोली, नवी मुंबई ,मूळ रा. दाजीपूर – कोल्हापूर ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने बुधवार 28 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर दाजीपूर येथील स्मशानभूमीत 29 ऑक्टोबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चत पत्नी, दोन मुली, आई, वडील, आजी, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. सर्वांशी सलोख्याने वागणाऱ्या सुनीलच्या अकाली निधनाने शोक व्यक्त होत आहे.