कणकवली : वागदेत महामार्गाच्या दोन्ही बाजुला 6 किलोमीटरवर वृक्ष लागवटीचा संकल्प

शेअर करा

मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा शुभारंभ ; सरपंच संदीप सावंत यांच्या संकल्पनेतून उपक्रम

कणकवली ,दि.२३ जून
पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनानुसार समाजोपयोगी उपक्रम वागदे सरपंच संदीप सावंत यांच्या संकल्पनेतून वागदेत महामार्गाच्या दोन्ही बाजुला 6 किलोमीटरवर वृक्ष लागवटीचा संकल्प करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त यावृक्षरोपणाचा शुभारंभ जि. प. सदस्य शितल दळवी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी पंचायत समिती सदस्य अक्षता राणे, ग्रा.प.सदस्य नीलम पालव , संजना गावडे,वागदे सरपंच संदीप सावंत समीर प्रभुगावकर, बूथ प्रमुख लक्ष्मण घाडीगावकर, भाई काणेकर, सुनील ताटे, संजय घाडीगावकर,महेश सरंगले,अमित दळवी उपस्थित होते. आगामी काळात वागदे
ग्रामपंचायत हद्दीमध्ये सावली साठी उपयुक्त अश्या प्रकराचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे संदीप सावंत यांनी सांगितले.

शेअर करा