कणकवली : कणकवली भाजपा कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

शेअर करा

कणकवली भाजप जनसंपर्क कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी…

कणकवली,दि.३१ मे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती कणकवली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपा तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री , खरेदी विक्री संघ चेअरमन प्रकाश सावंत , शहराध्यक्ष अण्णा कोदे , उपसरपंच सर्वेश दळवी , साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम , अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष निसार शेख , कळसुली सरपंच सचिन पारधीये , सुभाष मालंडकर , प्रशांत राणे , ऋत्विक नलावडे , इब्राहिम शेख आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा