कणकवली : कणकवलीत बाजारपेठेसह महामार्गावरील अतिक्रमण हटवा

शेअर करा

नगरपंचायतचे पथक मुख्याधिका-यांच्या उपस्थितीत ॲक्शन मोडवर ; प्लास्टिक पिशवी विक्रेत्यांवर केली दंडात्मक कारवाई

कणकवली, दि.०४ जुन

कणकवली नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर पूर्व सुचना देण्यासाठी मुख्याधिकारी गौरी पाटील या मैदानात उतरल्या. नगरपंचायतच्या पथकाने मुख्य बाजारपेठ त्यानंतर पटवर्धन चौक ते एसटी स्टॅंड पर्यंत अनाधिकृत विक्रेत्यांना अतिक्रमण हटवण्याच्या सुचना देत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. यादरम्यान अवैध प्लास्टिक पिशवी विक्री करणा-या दुकानदारांवर तब्बल 20 हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील फळे , फुले , भाजी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील अनाधिकृत विक्रेत्यांना अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम मुख्य बाजारपेठेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांच्या हद्दीबाहेर आलेले स्टॉल व साहित्य हटविण्याबाबत तोंडी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर नगरपंचायतीचे पथक मुंबई – गोवा महामार्गावरील उड्डाणपूलाखालील परिसरात पोहोचले. तेथील विक्रेत्यांनाही आपापले स्टॉल, दुकाने व अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी काही स्टॉलधारक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाले. मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अतिक्रमणाबाबत कठोर भूमिका घेत संबंधितांना स्पष्ट शब्दांत अतिक्रमण हटवणार असल्याचा इशारा दिला आहे. यावेळी आमचा अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला विरोध नाही, आम्हाला पर्यायी जागा द्या , अशी मागणी भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अनिल हळदिवे यांनी केल

शेअर करा