कणकवली : नांदगाव येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘यमाईचा संप्राम’ नाट्यप्रयोगाचे आयोजन

शेअर करा

कणकवली , दि. २० जून

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दि. २३ जून २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता नांदगाव (ता. कणकवली) येथील श्री महापुरुष सभागृह, माळीवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘यमाईचा संप्राम’ सादर होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कथा संकल्पना अजित गाडगीळ (भटजी) यांची आहे. विशेष सहाय्य दशावतार नाट्यमंडळ सिंधुदुर्ग व श्री भूमिका माया पूर्वचारी दशावतार नाट्यमंडळ, मळगाव-सावंतवाडी यांचे लाभणार आहे.

या नाट्यप्रयोगास रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

शेअर करा