कणकवली ते कोरिया कोकणकन्येची शैक्षणिक भरारी

शेअर करा

कणकवलीच्या कु.लोचना कोवळे हिला दक्षिण कोरिया येथे पी.एच.डी प्रदान.

कणकवली, दि. १९ जून


कणकवली येथील लोचना कोवळे हिला नुकतीच दक्षिण कोरिया येथील नामांकित क्युंग ही विद्यापीठ यांनी पी.एच.डी. पदवी प्रदान केलेली आहे. लोचना हीने डेमोलीन-बी सेन्सिटायझर हीप्याटो सेल्युलर कार्सिनोमा बाय टारगेटिंग ऑटोफॅगी अँड जॅक-२/स्टेट-थ्री मेडिटेड एपिथेलिय मिशन चायनल ट्रान्झिशन (“Damulin B sensitiser hepatocellular carcinoma to doxorubicin by targeting autophagy and JAK-2/STAT-3 mediated Epithelial mesenchymal transition “) या महत्त्वपूर्ण विषयावरती संशोधन व शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. या संशोधनाच्या आधारावरती कुंग ही या विद्यापीठाने ही पदवी प्रदान केली. लोचना कोवळे हिला संशोधनासाठी डॉ. जू हून यांचे मार्गदर्शन लाभले. लोचना हिचे प्राथमिक शिक्षण कणकवली या ठिकाणी झाले. बारावी व बी.एस्सी. चे शिक्षण कणकवली कॉलेज, कणकवली येथे झाले आहे. सूक्ष्मजीवशास्त्र या विषयांमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला दक्षिण कोरिया येथील कुंग ही विद्यापीठाची एम. एस. साठी शिष्यवृत्ती व त्यानंतर पी.एच.डी.साठीही शिष्यवृत्ती मिळाली. चांगल्या पद्धतीने वेळेचे नियोजन आणि संधीचा फायदा घेत तिने वयाच्या 2८ व्या वर्षी पी.एच.डी. ही सर्वोच्च पदवी प्राप्त केली आणि सध्या ती सहाय्यक संशोधक या पदावर दक्षिण कोरिया या ठिकाणी कार्यरत आहे. तिच्या शैक्षणिक यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, कणकवली कॉलेज, कणकवलीचे प्राचार्य व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*आमच्या मुलीने आमचा विश्वास सार्थ करत हे यश मिळविलेआहे त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आणि कौतुक आहे.
-मंगेश कोवळे लोचना हीचे पालक.

*संशोधन सारखी निवडलेली वेगळी दिशा आणि लोचनाचे हे यश खरोखरच बाकी विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत आहे.
-प्राचार्य युवराज महालिंगे कणकवली कॉलेज कणकवली.

शेअर करा