कणकवली,दि.१७ जून
हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि शौर्य, पराक्रमाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त मराठा मंडळ, कणकवली येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच ज्योत प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाराणा राणे प्रताप समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. समाजाचे ज्येष्ठ सल्लागार डॉ. चंद्रकांत राणे, अनमोल रावराणे, अजय रावराणे, सुनील रावराणे, संदीप राणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्य, त्याग आणि स्वाभिमानी विचारांचे स्मरण करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. त्यांच्या आदर्श विचारांमधून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे मत यावेळी तुळशीदास रावराणे यांनी व्यक्त केले.