कणकवली : मायनिंग, औष्णिक प्रकल्पांना पालकमंत्र्यांचा विरोध कायम असणार का? – परशुराम उपरकर

शेअर करा

ठाकरे शिवसेना या प्रकल्पांना विरोध करणार ; मुणगेतील प्रस्तावित औष्णिक ऊर्जा प्रकल्प विनाशकारी

कणकवली , दि. २० जून

दिल्लीश्वरांनी सिंधुदुर्ग जिल्ह््यातील वेंगुर्ले तालुक्यातील आजगावात मायनिंग प्रकल्प व देवगड तालुक्यातील मुणगेत औष्णिक ऊर्जा प्रकल्प यांसारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. या प्रकल्पांना ग्रामस्थांचा विरोध आहे. निसर्गरम्य भागात विनाशकारी प्रकल्प आणण्याचे धाडस कोण करीत असेल, तर पालकमंत्री या नात्याने सर्वप्रथम आपलाच त्याला विरोध असेल, अशी भूमिका मंत्री राणेंनी घेतली आहे. त्यामुळे विनाशकारी प्रकल्पांच्या विरोधात असलेल्या ग्रामस्थांच्या बाजूने मंत्री नितेश राणे हे शेवटपर्यंत राहणार आहेत का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.सिंधुदुर्गातील विनाशकारी प्रकल्पांना ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून ठाकरे शिवसेना या प्रकल्पांना विरोध करणार, अशा इशारा त्यांनी दिला.

येथील संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. उपरकर बोलत होते. श्री. उपरकर म्हणाले, खा. नारायण राणे हे महसूलमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्ह््यात कळणे मायनिंग प्रकल्प आला होता. या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी लावलेल्या जनसुनावनीत कळणे मायनिंग प्रकल्पाला विरोध केला होता. प्रशासनाने राजकीय दबावापोटी ग्रामस्थांवर खोटे गुन्हे दाखल केले होते, हा इतिहास मंत्री नितेश राणे यांना जाणून घेतला पाहिजे, असा टोला श्री. उपरकर यांनी लगावला.
देवगड तालुक्यातील औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला माजी मंत्री भाई गिरकर व भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. प्रकल्पांना विरोध करणाºयांची डोकी फोडण्याचे काम राणे समर्थकांनी केले होते. सध्या प्रस्ताविक असलेल्या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्याबाबतीत भाजपच़्या जुने कार्यकर्त्यांची भूमिका काय आहे, असा सवाल उपरकर यांनी केला. सी-वर्ल्ड, चिपी विमानतळ प्रकल्पांसाठी जादा जागा संपादित केल्यामुळे या प्रकल्पांना ग्रामस्थांनी विरोध केला होता, असे त्यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील बेरोजगारांना रोजगार देण्याची राणे कुटुंबीयांची भूमिका असेल तर खा. राणेंनी ओरोस येथे रखडलेले केंद्र शासनाच्या प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्णत्वास नेऊन हे केंद्र उभारून दाखवावे, तसे केल्यास आम्ही खा. राणेंच्या आम्ही अभिनंदन करू, असे उपरकर यांनी सांगितले. आजगाव दशक्रोशीत मायनिंग होणार नाही, असे मंत्री नितेश राणे यांनी जाहीर केले. या वक्तव्याशी मंत्री राणे शेवटपर्यंत ठाम राहणार आहेत का, असा सवाल त्यांनी केला.

शेअर करा