कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठानतर्फे ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शेअर करा

कणकवली, दि. २० जून

महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवार दिनांक २२ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता माध्यमिक विद्यालय कनेडी येथे इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा आकर्षक भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

तसेच मंगळवार दिनांक २३ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे मोफत वृक्ष वाटप व मिठाई वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश ऊर्फ गोट्या सावंत व अध्यक्षा संजना संदेश सावंत यांनी केले आहे.

शेअर करा