कुडाळ: ,दि.१५ जून
बिबवणे – नाईकवाडी येथील संजना संतोष साटम (वय २८) या गेल्या १० दिवसापासून बेपत्ता झाल्या आहेत. याबाबतची तक्रार त्यांचे पती संतोष साटम यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली.
संजना साटम या ५ जून रोजी सकाळी आपल्या घरातून कुडाळ येथे जाण्यासाठी बाहेर पडल्या. कुडाळ येथे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिराला जाते, असे त्यांनी घरात सांगून त्या निघाल्या. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. पोलीसही त्यांचा शोध घेत आहेत. पण त्या अद्याप सापडल्या नाहीत. कुणाला त्या आढळल्यास मोबा. ९७६५८३९१५१ आणि ९४०४४४६०६६ येथे संपर्क साधावा.