कुडाळ,दि.०३ ऑक्टोंबर
वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, गुरुवर्य कै. श्री शशिकांत अणावकर सर विद्यानगरी, पणदूर तिठा येथे राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रशालेतील विज्ञान शब्द मंडळाच्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दया अणावकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जिल्हा रुग्णालय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी केली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक कर्पे तसेच कु. देवश्री गोलतकर (आठवी ब), कु मिताली हेबाळकर (सातवी अ) या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्था सचिव नागेंद्र परब, प्रशालेचे मुख्याध्यापक एम. जी. कर्पे, पर्यवेक्षिका दाभोलकर, विज्ञान विभागप्रमुख सुविधा कवठणकर, विज्ञान छंद मंडळ अध्यक्षा वैदेही सावंत, विज्ञान शिक्षक रुपेश कर्पे, सर्जेराव झेंडे, सहकारी शिक्षक दीपक हेबाळकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय परब, प्रयोगशाळा सहाय्यक वीरेंद्र गोसावी व इतर शिक्षक वृंद व विद्यार्थी, प्रयोगशाळा परिचर संदीप गवाणकर, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आभार शिक्षिका कवठणकर यांनी मानले. तर ग्रंथपाल नरेश परब यांच्या सहकार्यामुळे रक्तगट तपासणी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.