जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रशालेची दमदार कामगिरी
कुडाळ,दि.२६ऑक्टोंबर
शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर-तिठा येथील विद्यार्थ्यांनी जनता विद्या मंदिर, त्रिंबक-मालवण येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय शूटिंगबॉल स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांचा संघ कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. तसेच वर्षांखालील मुलांचा संघ — कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी पात्र आणि वर्षांखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.
या जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेच्या ठिकाणी अमित भाटकर (क्रीडा शिक्षक), वैभव कोंडासकर, महेंद्र वारंग, शिक्षक सपकाळ, प्रणिता वानखडे (तालुका क्रीडा अधिकारी), संजय पेंडुरकर (मालवण तालुका समन्वयक) आदी उपस्थित होते.
