कुडाळ,दि.२१ ऑक्टोंबर
मुंबई-गोवा महामार्गावरील पावशी येथे आज संध्याकाळी ५.३० च्या सुमारास एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सीताराम उर्फ गणेश गोपाळ वालावलकर (पावशी शाक्यनगर, वय ३२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण पावशी मिटक्याचीवाडी फाटासमोर असलेल्या दुकानाचा बाजूला संध्याकाळी चालत जात असताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यावेळी बाजूच्या नागरिकांनी त्याला तत्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
