कुडाळमध्ये ‘युवासेना’ सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन

शेअर करा

कुडाळ :

युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा येत्या रविवार, दिनांक ७ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.


स्पर्धेची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे : स्पर्धेचा दिनांक: रविवार, ७ जून २०२६ वेळ : सकाळी ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत
स्पर्धेचे ठिकाण: मराठा हॉल, कुडाळ हायस्कूल जवळ, कुडाळ, महाराष्ट्र ४१६५२०
वयोगट मर्यादा: १८ ते ३५ वर्षे
प्रवेश : पूर्णपणे मोफत (प्रवेश विनामूल्य)स्पर्धेचे विषय (खालीलपैकी एक):१. Vision Maharashtra 2050 २. राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका(टीप: प्रत्येक स्पर्धकाला वक्तृत्वासाठी ४ मिनिटांचा कालावधी दिला जाईल.) आकर्षक पारितोषिके:प्रथम पारितोषिक: ₹१०,००,००/- (दहा हजार रुपये) व चषकद्वितीय पारितोषिक: ₹७,०००/- (सात हजार रुपये) व चषकतृतीय पारितोषिक: ₹५,०००/- (पाच हजार रुपये) व चषकविशेष: स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ‘सहभाग प्रमाणपत्र’ दिले जाईल.नाव नोंदणी व संपर्क:स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा:संपर्क प्रमुख: मंदार शिरसाटमोबाईल क्रमांक: +९१ ९९२३७ ४२१२१सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण-तरुणींनी या वक्तृत्व स्पर्धेत उस्फूर्तपणे सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, असे आवाहन युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा