Kudal : कुडाळच्या कुंभारवाडीमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारा

शेअर करा

नगरसेवक उदय मांजरेकर यांचा पुढाकार

नगराध्यक्षा प्राजक्ता बादेकर याच्या शुभहस्ते शुभारंभ

कुडाळ,दि.१५ ऑक्टोंबर

कुडाळ शहरातील कुंभारवाडीमध्ये नगरसेवक उदय माजरेकर, स्थानिक ग्रामस्थ व नगरपंचायत प्रशासन याच्या पुढाकारातून प्रथमच वनराई बंधारा बाधण्यात आला आहे. या बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता वनराई बंधारे बांधण्याची मोहीम जोरदार सुरु आहे. यातच कुडाळ शहरातील कुंभारवाडी येथेही नगरसेवक उदय मांजरेकर यांनी आपल्या प्रभागात वनराई बंधारे
बांधण्यासाठी पुढाकार घेतला असून लोकसहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यावेळी
नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर नगरसेवक उदय मांजरेकर, मुख्याधिकारी खंडू पवळ, पाणीपुरवठा अधिकारी रसिका नाडकर्णी, बांधकाम अभियंता सोनाली हळदणकर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्थ अरुण मांजरेकर, बंड्या मांजरेकर, सागर कुंभार, शुभम कुंभार, रितेश मांजरेकर आदित्य कुंभार, आर्यन कुंभार, सोहम प्रभू निलेश कुंभार, अण्णा कुंभार रामदास कुंभार, ओमकार कुंभार, राजा मांजरेकर, मधुकर कुंभार, मनीष कुंभार, विनायक मांजरेकर, सुप्रिया मांजरेकर, उत्कर्ष मांजरेकर, पूजा मांजरेकर, सरिता मांजरेकर विजया मांजरेकर, अवनी मांजरेकर तसेच अंगणवाडीसेविका अक्षता जाधव, दीपिका साटम, मदतनीस कुडाळकर याही सहभागी झाल्या होत्या. तसेच अशा स्वयंसेविका श्रुती कुंभार , शिल्पा कुंभार याही सहभागी झाल्या होत्या. तसेच पीएम श्री जिल्हा परिषद शाळा कुंभार वाडा, कुडाळ श्रद्धा देसाई, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मंगल म्हापणकर, सदस्य,विजय धामापूरकर, मुख्याध्यापक, गौरी गोसावी, गुरुप्रसाद सावंत आदी उपस्थित होते.
पाणी अडवा पाणी जिरवा, वनराई बंधारा बांधूया, दुष्काळावर मात करूया. पाणी हे जीवन आहे. असा नारा यावेळी देण्यात आला. वनराई बंधारा बनण्यासाठी स्थानिक नगरसेवक उदय मांजरेकर व नगरपंचायत प्रशासनाने विशेष मेहनत घेतली.

शेअर करा