Kudal News:वेताळ बांबर्डे नाग्या महादू निवासी वसतिगृह आश्रमशाळेचा मल्लखांबात डंका!

शेअर करा

चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड; चमकदार कामगिरी

कुडाळ,दि.०९ऑक्टोबर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत आयोजित शालेय जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धा “वेताळ बांबर्डे नाग्या महादू निवासी वसतिगृह, कुडाळ” येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत वेताळ बांबर्डे आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

या स्पर्धेत उजा पवार (१४ वर्षे मुली) सुवर्णपदक, प्रथम क्रमांक,
सागर प्रकाश निकम (१७ वर्षे मुलगे) द्वितीय क्रमांक, रौप्य पदक, रोहित चंदू निकम (१७ वर्षे मुलगे) ब्राँझ पदक, तृतीय क्रमांक, वनिता चंदू निकम (१९ वर्षे मुली) सुवर्णपदक, प्रथम क्रमांक अशी या चारही खेळाडूंची विभागीय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विजयी खेळाडूंना उदय आईर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आप्पा गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक मिलिंद कर्पे आणि पर्यवेक्षिका दाभोलकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा