​मळगाव : मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिरची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ जून रोजी

शेअर करा

मळगाव,दि.२३ जून
येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनमंदिर मळगाव या संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे,
​या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होऊन त्यांना मंजुरी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश असेल:


​मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.​सन २०२५-२६ या वर्षाचा वार्षिक अहवाल आणि जमाखर्चाला मंजुरी देणे.
​वर्ष २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाला (बजेट) मान्यता देणे.​वर्ष २०२६-२७ या आगामी वर्षासाठी हिशेब तपासनीसाची (ऑडिटर) नेमणूक करणे.
​ग्रंथालयाचा रौप्य महोत्सव साजरा करण्याबाबत नियोजन करणे.
​संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सभासदांना डिजिटल माध्यमाद्वारे देण्यास मान्यता देणे.
​या सभेला सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर आणि कार्यवाह स्नेहा खानोलकर यांनी केले आहे.

शेअर करा