मालवण : ‘शिवराज भूषण’ महानाट्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उद्या

शेअर करा

श्री शिवराज मंच मालवणच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे जतन करणाऱ्या महानाट्याला वर्षपूर्ती

मालवण, दि ०५ जुन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य विचारांचे संवर्धन करणारी संस्था ‘श्री शिवराज मंच मालवण’ यांच्या वतीने निर्मिती करण्यात आलेल्या प्रसिद्ध ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा प्रथम वर्धापन दिन सोहळा उद्या ता. ६ जून रोजी साजरा होणार आहे.

हा सोहळा येथील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोरील प्रांगणात संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने संध्याकाळी ७ ते ८.३० या वेळेत भव्य ‘ऐतिहासिक विविध सांस्कृतिक कार्यक्रम’ सादर केले जाणार आहेत.

या वर्धापन दिन सोहळ्याला आमदार प्रमोद जठार, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याला सर्व शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा