मालवण : लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त मालवण येथे 26 जून रोजी जाहीर सभेचे आयोजन

शेअर करा

मालवण,दि.२३ जून

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता मालवण एस. टी. डेपो मागील समाज मंदिर, येथे आंबेडकर चळवळीचे अभ्यासक, कणकवली येथील डॉ. सोमनाथ कदम यांचा व्याख्यान कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मालवण नगरपालिकेच्या मागासवर्गीय कल्याण समितीचे सदस्य तथा नगरसेवक सिद्धार्थ जाधव तसेच स. का. पाटील कॉलेज, मालवणचे प्राचार्य कैलास राबते आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव हे उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच, मालवणचे अध्यक्ष रंजन तांबे हे भूषविणार आहेत.
राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक समता, शिक्षण, बहुजन कल्याण आणि प्रगत विचारांचा जागर करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा