मालवण : बांगीवाडा नाक्यावरील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू…

शेअर करा

‘या’ मार्गांवरून अवजड वाहनांना ८ दिवस बंदी…

मालवण, दि. १९ जून

मालवण शहरातील धामापूर नळपाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिन्यांवरील दुरुस्तीचे काम मालवण नगरपरिषदे तर्फे हाती घेण्यात आले आहे. बांगीवाडा नाका येथील रस्त्यामध्ये असलेले जुने आणि नादुरुस्त झालेले दोन मुख्य ‘गेटव्हाल्व’ बदलून त्याठिकाणी नवीन गेटव्हाल्व बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
हे दुरुस्तीचे काम पुढील आठ दिवस सलग चालू राहणार आहे. या कामामुळे संबंधित परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, नगरपरिषदेने वाहतुकीत महत्त्वाचे बदल केले असून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
काम पूर्ण होईपर्यंत बांगीवाडा नाक्याकडे येणाऱ्या प्राईड हॉटेल ते बांगीवाडा नाका, नागेश्वर पार्क कॉम्प्लेक्स ते बांगीवाडा नाका, डॉ. राहुल वझे रुग्णालय, नाट्यगृह ते बांगीवाडा नाका या तीन प्रमुख रस्त्यांवरून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे:
हे काम संपेपर्यंत ८ दिवस या मार्गांवरून कोणत्याही अवजड वाहनाला प्रवेश दिला जाणार नाही.
धरण योजनेच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी हे काम अत्यंत तातडीचे आणि महत्त्वाचे आहे. त्यामुळे मालवण शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या सर्व अवजड वाहनांच्या चालकांनी, वाहतूकदारांनी आणि स्थानिक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि काम वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा